कॅनॉलला मोठे भगदाड पडल्याने पूरसदृश्य स्थिती

बारामती : एका बाजूला अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत असतानाच, दुसऱ्या बाजूला बारामती तालुक्यातील पिंपळी येथे पालखी महामार्गाजवळील कॅनॉलला मोठे भगदाड पडल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे परिसरातील शेतजमिनी आणि काही घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
पाण्याचा जोरदार प्रवाह शेतात आणि महामार्गाच्या रस्त्यावर साचला असून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाला मोठा फटका बसणार आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. अवकाळी पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे.
कॅनॉल फुटल्याचा सविस्तर व्हिडिओ खाली