बारामतीत घरफोडी ; दीड लाख रुपयांचा मुद्देमाल गेला चोरीला
बारामती : बारामतीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून अंदाजे एक लाख ५४ हजारांचा रोख रकमेसह सोन्याचांदीचा ऐवज चोरी करून नेल्याची फिर्याद बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे .
सविस्तर हकीकत अशी कि दि. १३ मे ते १९ मे या कालावधीत आर्यन रेसिडेन्सी, गनाजी नगर रुई ता बारामती येथील बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,54,000/- रु चा मुद्देमाल चोरी करून नेला आहे या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात हर्षद पाटील यांनी फिर्यादी दिली आहे.
