बारामतीची तरुणाई गांजाच्या आहारी ; विक्री करणारे मोकाट
बारामती : बारामतीत सात तरुणांवर गांजा सेवनप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र, गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असुन प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
नागरिकांचा सवाल: विक्रेत्यांवर कारवाई का नाही ?
गांजा सेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणे हे कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे. मात्र, गांजाचा पुरवठा करणारे विक्रेते आणि तस्कर यांच्यावर कारवाई न झाल्यास, या समस्येचे मूळ कायम राहते. नागरिकांचा सवाल आहे की, केवळ सेवन करणाऱ्यांवर कारवाई करून या समस्येचे समाधान होऊ शकते का ? त्यासाठी प्रशासनाने सेवन करनारांपेक्षा गांजा विक्री करणारांचे वेळीच कंबरडे मोडावे.
बारामतीत कारवाईची गरज
गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केल्यास या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. बारामतीतही अशा प्रकारची कारवाई होणे आवश्यक आहे. पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात तपास सुरू करून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक असले तरी, गांजाचा पुरवठा करणाऱ्यांविरोधातही तितकीच कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा, या समस्येचे मूळ कायम राहील आणि तरुणाई व्यसनाच्या गर्तेत अडकत राहील. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी जोर धरत आहे.
अनेक ठाण्यात दि.14 मे व 15 मे रोजी गांजा सेवन करणारांवर कारवाई झाली ती दाखविण्यासाठीच होती काय ? तसे नसेल तर सेवन करणारांच्या माध्यमातून विक्री करणारांच्या मुसक्या वेळीच का आवळल्या जात नाहीत ? असा सूर शहराच्या चौका-चौकात होताना निदर्शनास येत आहे.
