बारामतीत घरफोडी, चार लाख 17 हजाराचा मुद्देमाल लंपास
बारामती : बारामती शहरातील गजबजलेल्या ठिकाणी घरफोडी झाली असून या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी साधारण चार लाख 17 हजार रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना समोर आले आहे.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात महावीर जैन यांनी फिर्याद दिली आहे सविस्तर माहिती अशी की बारामती येथील संघवी टाऊनशिप भिगवण रोड येथे राहत असलेल्या एका महिलेच्या घरात घरफोडी झाली असून या घरपोडीत तिचे सोन्या चांदीचे दागिने आणि टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर दुचाकी गाडी चोरीला गेली आहे हा प्रकार 9 मे ते 14 मे या कालावधीत घडला असून यात एकूण चार लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा लॉक तोडून घरात प्रवेश करून घरफोडी करून लंपास केला आहे.
