आमिष दाखवुन एक कोटी ५० लाखांची फसवणूक
बारामती : ऍग्रो फार्ममध्ये गुंतवणुक करा दरमहा वीस टक्के इन्सेंटिव्ह देऊ असे आमिष दाखवून चक्क एक कोटी ५० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून गुंतवणूक दारांच्या फसवणुक लक्षात आल्यानंतर पुन्हा पैसे मागितले म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
सविस्तर हकीकत अशी की आरोपी आनंद सतीश लोखंडे याने विद्यानंद ऍग्रो फीड्स लि. या ऍग्रो फार्ममध्ये फिर्यादीस रोख स्वरूपात पैसे गुंतवा मी तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर प्रति महा 20 टक्के इन्सेंटिव्ह दर महिन्याचे 10 तारखेला देईल असे सांगून फिर्यादी आकाश उर्फ सुयोग कुंडलिक भिसे व अजय शिवाजी ओमासे याचे कडून एकूण 1 कोटी 50 लाख रुपये रक्कम रोख स्वरूपात घेऊन ठरल्याप्रमाणे इन्सेंटिव्ह व दिलेले रोख रक्कम फिर्यादीस परत न देता फिर्यादीची फसवणूक केली. तसेच फिर्यादीस पैसे देतो म्हणून आरोपी लोखंडे याने यातील साक्षीदार अजय शिवाजी ओमासे, अक्षय मोहन खुरंगे व फिर्यादी आकाश उर्फ सुयोग कुंडलिक भिसे यांना त्यांचे राहते घराचे जवळ बोलून अंगावर धावून येऊन दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच फिर्यादी याचे हातातील एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी जबरीने काढून घेतल्या प्रकरणी आरोपी आनंद सतीश लोखंडे ( रा. जळोची ता. बारामती ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
