October 24, 2025

जेव्हा…दुसऱ्या मजल्यावर पोहोचली गाय

पुणे : पुणे शहरातील रविवार पेठ येथील एका कापड गल्लीत गाय घुसली ती थेट एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन एका घरात शिरली मात्र तिला त्या इमारतीच्या अरुंद जिन्यातून खाली उतरता येईना अन  तिथेच ती अडकुन पडली.

ज्या घरात आणि इमारतीत गाय घुसली होती तेथील नागरिकांची सकाळी – सकाळी गाय इमारतीत आल्याने एकच धांदल उडाली त्या गाईला खाली आणण्यासाठी स्थानिकांनी खुप प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न व्यर्थ ठरले.

नाईलाजाने सरते शेवठी स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या अग्निशमक विभागाला कळविले अग्निशमक विभागानेही अखेरीस गाईला क्रेन लावुन सुखरूप खाली उतरविले.

You may have missed

error: Content is protected !!