माळेगाव पोलिसांनी खूनाचा छडा लावीत आरोपींच्या आवळल्या मुसक्या

बारामती : मजुरी करणाऱ्या मुलाच्या आईकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा राग मनात धरून खुन केल्याचा तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे कपडे जाळून मयताला विहिरीत टांगल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघड झाला आहे माळेगाव पोलिसांनी शिताफीने अवघ्या पाच तासातच गुन्ह्याचा तापस करीत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
माळेगाव पोलीस ठाण्यात दि. ७ मे रोजी शेतविहिरीत प्रेत तरंगत असले बाबतची माहीती पोलिसांना मिळाली प्रेत विहिरीच्या बाहेर काढुन सदर प्रेताची पाहणी केली असता त्यांचे डोक्याला तसेच चेहऱ्यावर मार लागल्याच्या खुना तसेच मयताचे मानेला साडी व दगड बांधलेला अवस्थेत मिळुन आल्याने. मृत्यू हा संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या निदर्शास आले. दरम्यान मयत व्यक्ती हि मारुती साहेबराव रोमन ( वय ५८ वर्षे रा खांडज ता. बारामती ) हे असल्याचे निष्पन्न झाले. वैदयकीय तपासणी व शवविच्छेदनानंतर मयत मारुती रोमन यांचा मृत्यु हा त्यांचे डोक्यात मारहाण केलेने झालेला असलेचा संशय व्यक्त केलेने सदरचा मृत्यु हा नैसर्गिक किंवा आत्महत्या नसुन तो खून झालेला असलेचे निष्पन्न झाले होते.
त्यातच घटनास्थळ निर्मनुष्य असल्याने गुन्ह्याची गुंतागुंत वाढत होती मयत मारुती रोमन यांचे कुटुंबातील आणि बाहेरील कोणाशी यापुर्वी वाद विवाद झालेला होता अगर कसे ? तसेच सदर मयत व्यक्ती यांस शेवटी कोणी पाहीले होते याची कसून चौकशी पोलिसांनी केली असता तपासा दरम्यान गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मयत व्यक्ती हा घटना घडणे पूर्वी मौजे खांडज ता. बारामती या गावात मजुरी कामासाठी बाहेरुन आलेल्या लोकांसोबत फिरताना निदर्शनास आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने गुन्हयाच्या तपासाची गती वाढली घटनेच्या काही अंतरावर तात्पुरते निवाऱ्यासाठी खोपी बांधुन राहणाऱ्या मजुरांकडे मारुती रोमन याचे बाबत चौकशी केली असता त्यांनी त्या व्यक्तीस ओळखत नसलेचे सांगून उडवा उडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे त्यांचे घरातील मजुरी काम करणारे इतर महीलांकडे माळेगाव पोलीस ठाणेचे पोलीस पथकातील महिला अंमलदार यांनी चौकशी केली असता महीला व पुरुष मजूर हे सांगत असलेल्या माहीतीमध्ये विसंगती निदर्शनास आलेने ते पोलिसांपासून चौकशी दरम्यान माहीती लपवत असल्याची खात्री पोलिसांची झाली घटनेच्या अनुषंगाने अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी यातील मयत व्यक्ती हा मारुती साहेबराव रोमन हा अधुन मधुन मजुरांचे खोपीवर येत जात होता, याच ओळखीतून मारुती साहेबराव रोमन याने मजुरी काम करणाऱ्या मजुराच्या आईकडे शरीर सुखाचे मागणी केलेली होती, तो प्रकार त्या महीलीने तीच्या मुलाला सांगितलेने त्याचा राग मनात धरून यांतील मयत व्यक्ती मारुती साहेबराव रोमन यांस विश्वासात घेवुन त्यास गोड बोलुन त्या परीसरातील निर्जन स्थळी नेवुन त्याचे डोकीत दगड घालुन त्याचा खून केलेला असल्याची व मयताची ओळख पटु नये म्हणुन त्याची कपडे काढुन गुन्हयाचा पुरावा नष्ट करणेचे उददेशाने ती पेटवुन दिली आणि प्रेत काही कालावधी करीता त्याच परीसरातील ऊसाचे शेतात लपवुन ठेवुन नंतर रात्रीचे अंधारात त्या प्रेताचे मयताचे हात पाय बांधुन ते प्रेत पाण्याचे वर येवु नये म्हणुन साडीने सहाय्याने मोठया दगडांना बांधुन विहीरीत टाकुन दिले असल्याचे कबूली दिली.
आरोपी नवनाथ शिवाजी घोगरे,( वय 25 वर्षे, मुळ रा. कार्ले भाजी लोणावळा ता.मावळ) व अनिल गोविंद जाधव ( वय 35 वर्षे मुळ रा. आंबेवाडी ता. रोहा ) यांना पोलिसांनी अटक केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक, गणेश बिरादार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ..सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, अमोल खटावकर, तुषार भोर, सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय मोहिते, पोलीस हवालदार सादिक सय्यद, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, महीला पोलीस हवालदार रुपाली धिवार, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत, अमोल वाघमारे, अमोल कोकरे, विकास राखुंडे, जालींदर बंडगर, सागर पवार, सुनिता पाटील यांनी केली.