बारामतीत भर दिवसा घरफोडी
बारामती : बारामती तालुक्यातील मौजे उंडवडी कडे पठार येथे भर दिवसा घरफोडी झाली असून या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी नऊ लाख 96 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. या भरदिवसा घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे गावात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या चोरांच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अप्पासो जराड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सविस्तर हकीकत अशी की दिनांक 3 मे रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान उंडवडी कडेपठार तालुका बारामती गावाच्या हद्दीत राहत असलेले आप्पासो जराड हे घराला कुलूप लावून शेतातील कामानिमित्त घराबाहेर पडले, शेतातील काम झाल्यानंतर जेव्हा ते सायंकाळी घरी परत आले तेव्हा घराचे कुलूप तोडून घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आहे. तसेच कपाटातील लॉकर मधून सोन्या-चांदीचे दागिने साधारण नऊ लाख 96 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे.
