बारामतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बारामती : घरात कुणीही नसल्याचे पाहून एका ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना बारामती तालुक्यातील मूर्टी येथे घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अण्णा किसन गोफणे (रा. मोराळवाडी, ता. बारामती) असे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिडीत अल्पवयीन मुलगी ही घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी अण्णा गोफणे याने जबरदस्तीने घरात प्रवेश करत या चिमूरडीवर अत्याचार केला. ही घटना समजल्यानंतर संबंधित पीडितेच्या कुटुंबीयांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अण्णा गोफणे याच्यावर भारतीय बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती जमाती कायद्या नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड करीत आहेत.