लग्नाची वरात, पोलीस स्टेशनचे दारात

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील तेरा वर्षाच्या मुलीचे लग्न लावून देण्याचा घाट घालणाऱ्या आई-वडिलांसह नवरदेवाला पोलिसांनी बेड्या ठोकण्याची घटना घडली आहे.
बारामती तालुक्यातील मौजे माळेगाव खुर्द येथे दिनांक 20 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान नातेवाईकांनी एकत्र येऊन मुलीचे लग्न ठरवले मात्र मुलीचे वय तेरा वर्ष आठ महिने असल्याने पोलिसांनीच लग्नात हस्तक्षेप करीत अल्पवयीन मुलीचे लग्न लावनारांना चांगलाच धाडा शिकविला.
विशेष म्हणजे हे लग्न ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असलेल्या यशवंत सभागृह या सभागृहात ठेवण्यात आले होते माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांना ही माहिती मिळता त्यांनी तात्काळ नवरा-नवरीच्या वयाची माहिती घेतली आणि नवरीचे वय तेरा वर्षे आठ महिने असल्याचे समजतात त्यांनी वधू-वर पक्षाच्या दोन्ही बाजूच्या आई-वडिलांसह नवरदेवावर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी माळेगाव ग्रामपंचायत अधिकारी इम्तियाज इनामदार यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माळेगाव पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीचे वडील राजेश अजगर भोसले आई वारणा राजेश भोसले (दोघे रा. माळेगाव खुर्द ता. बारामती ) नवरदेव राहुल भानुदास शिंदे नवरदेवाचे वडील भानुदास मायाजी शिंदे व आई रूपाली भानुदास शिंदे ( रा. पिंपरी ता. खंडाळा,) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे