वाटसरूंना लुटणारी टोळी जेरबंद

बारामती : बारामती परिसरात रात्रीच्या वेळेस वाटसरूंना लुटणारी सराईत टोळी अखेर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले असून, या कारवाईत चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मागील दहा दिवसांमध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एमआयडीसी भिगवण रोड, सिटी इन चौक, बारामती क्लब परिसरात अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळेस वाटसरूंना अडवून, मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पिडीत नागरिकांकडून फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या.
या गंभीर घटनांची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी घटनास्थळांची पाहणी करून, सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून तीन घटनांमध्ये समान कार्यपद्धती, एकसारखी मोटारसायकल व आरोपींचे वर्णन मिळून आले.
गोपनीय माहितीच्या आधारे निलेश गोरे (रा. खंडोबानगर, बारामती) व साथीदार अरबाज शेख, अविनाश ऊर्फ माऊली लोंढे या तिघांनी हे गुन्हे केल्याचे उघड झाले. अरबाज ऊर्फ बबलू हैदर शेख (वय २४ वर्षे खंडोबानगर, बारामती ) व अविनाश ऊर्फ माऊली धनंजय लोंढे (वय १९ वर्षे रा. मळद ता. बारामती) यांना अटक करून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या सोबत निलेश गोरे हा देखील गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले
याशिवाय, बारामती क्लब परिसरातील एका जबरी चोरी प्रकरणाच्या तपासात समाधान दतात्रय खंडागळे (वय १९ वर्षे ) व रोहित विठ्ठल पवार (वय १९ वर्षे दोघे रा.दादापाटील नगर, तांदुळवाडी, बारामती) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे त्यांच्या सोबत देखील आणखी एक साथीदार असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षककुलदीप संकपाळ, विक्रम पवार, अंमलदार बाळासाहेबकारंडे,स्वप्नील अहिवळे, अभिजित एकशिंगे, अतुल डेरे,राजु मोमीन,ज्ञानदेव क्षीरसागर,अजय घुले, निलेश शिंदे, धीरज जाधव, अमोल शेंडगे यांनी केली.