दादाचा वादा… बारामतीत चर्चेला उधाण

बारामती : बिग बॉस सुपरस्टार सूरज चव्हाण याच्या गावी जावून त्याच्या घराच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
सुरजला चव्हाण बिग बॉस सुपरस्टार विजेतेपद मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी निवडणुकीची धावपळ असताना अजित पवार यांनी सूरजसाठी घर बांधण्याच्या सूचना दिल्या होत्या सध्या त्याच्या घराचे काम प्रगतीपथावर आहे काम सुरु असताना आणि दादा बारामतीच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असताना चक्क सूरज चव्हाण याच्या घराच्या कामाचा आढावा घेतल्याने दादाचा वादा या चर्चेला उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या पश्चिम भागाच्या दौऱ्यावर होते बारामती तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी ते गेले असताना सूरज चव्हाण याच्या गावात दाखल झाले. त्यांनी सूरज चव्हाण याच्या घराच्या बांधकामाच्या आढावा घेतला. ठेकेदारास बोलवून घर कधी पूर्ण होणार ? अशी विचारणा केली. त्यावेळी दिवाळीपर्यंत सूरज चव्हाण स्वत:च्या घरात जाणार असल्याचे त्या ठेकेदाराने अजित पवार यांना सांगितले. त्यावर कामात कुठेही कसूर राहता कामा नये कामची गुणवत्ता चांगली असली पाहिजे अशा सुचना पवारांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या.