मार्केटिंगचे शिक्षण घेवून हायड्रोफोनीक गांजा विकनारावर पोलिसांची कारवाई

पुणे : मार्केटिंग आणि सेल्सचा पदवीधर असलेला आणि एका खाजगी कंपनीत काम करीत असलेल्या एका पदवीधर असलेल्या युवकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करीत चक्क हायड्रोफोनीक गांजा करताना अटक केली आहे. त्याच्याकडून ५,५६,४००/- रु किंमतीचा ओझोकुश गांजा (हायड्रोफोनीक गांजा) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
दि.१० एप्रिल रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेले बातमीवरुन शिवशक्ती चौक, रीक्षा स्टॅन्ड जवळ, बाणेर, येथे सार्वजनिक ठिकाणी अर्जुन लिंगराज टोटिगर,( वय २६ वर्षे, रा. सुसगांव, बाणेर, पुणे ) याच्या ताब्यात एकुण ५,५६,४००/- रू. किमतीचा त्यामध्ये ३,०५,४००/- रु. किमतीचा ३० ग्रॅम ५४० मिली ग्रॅम ओझोकुश गांजा (हायड्रोफोनीक गांजा) तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द बाणेर पोस्टे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी हा मार्केटींग आणि सेल्सचा पदवीधर असून सध्या तो खाजगी कंपनीमध्ये काम करीत आहे. वरील नमुद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त,राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, प्रशांत बोमादंड्डी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, दिनेश बास्टेवाड यांनी केली.