December 9, 2025

तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या

1694231847314

वडगाव निंबाळकर : तू माझ्याशी लग्न नाही केले तर, तुझ्या आई वडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने कोऱ्हाळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की १५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे (सर्व रा. कोऱ्हाळे खु.ता.बारामती ) हे गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते. मेसेज वर धमक्या देत होते. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होते. चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सात एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करत आहेत.

error: Content is protected !!