पुन्हा कोयताधारी युवक पोलिसांच्या ताब्यात

बारामती : बारामती बस स्थानकावर कोयता बाळगुन संशयित रीत्या फिरत असणारा युवक पोलिसांनी पकडला असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकिकत अशी की दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बारामती बस स्थानक परिसरामध्ये एक तांदुळवाडी डेरेवस्ती येथील तरुण कोयता जवळ बाळगून बस स्थानकात संशयितरित्या फिरत असल्याची पोलिसांना खबर मिळाली मिळालेल्या खबरीनुसार पोलिसांनी बस स्थानकात एका युकाला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे कमरेला बांधलेला लोखंडी कोयता पोलिसांना आढळून आला अधिक चौकशी केली असता युवकाने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली.
युवकावर पोलीस कायदा कलम आणि शस्त्र अधिनियमन नियम नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.