बारामतीत गुंडगिरी करणाऱ्यांवर मोक्का लावू… अजित पवार

बारामती : बारामतीत कसलीही गुंडगिरी खपवून घेणार नाही, गुंडगिरी करणाऱ्या वर मकोका ची कारवाई करू असा इशारा देत कोणीही कायदा हातात घेऊ नका असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना संताप व्यक्त केला.
बारामती येथील पंचायत समितीच्या कार्यक्रमात बोलताना पवारांनी इशारा दिला पुढे पवार म्हणाले की बारामतीत एका युवकाला चार जणांनी बेदम मारहाण केली त्याची व्हिडिओ क्लिप मी स्वतः पाहिली आहे असली दादागिरी आणि गुंडगिरी मी खपवून घेणार नाही तर त्या संदर्भाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड यांना सूचना केल्या आहेत त्यांनी योग्य कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असे व्यक्त करीत, झालेली मारहाण चुकीच्या पद्धतीने झाली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी प्रसंगी माझे कार्यकर्ते असतील किंवा त्यांची मुले असली तरीही त्यांना पाठीशी घालू नका असा सज्जड इशारा पवार यांनी बोलताना दिला तर संविधानाचे 75 वर्षे पूर्ण होतात तरीही काही लोकं स्वतःच्या घराची मालमत्ता असल्या सारखी ठोकून काढीत आहेत, हे होता कामा नये असेही व्यक्त केले.
बारामतीकर पालकांनी आपली मुले काय करतात, कुठे जातात, कोणासोबत फिरतायेत त्यांचे काय सुरू आहे याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे ती त्यांनी पार पाडावी असे देखील पवार बोलले, तर चुकीच्या गोष्टी करून काही लोक मला मुंबईला फोन करून चुका पोटात घ्या, …..पोटात घ्या…, म्हणतात मात्र ह्यांच्या चुका पोटात घेऊन घेऊन माझं पोट फुटायला लागलं आणि कुठवर चुका पोटात घ्या म्हणताहेत अशा फोन करणाऱ्यांना तरी लाज कशी वाटत नाही असे संताप अजित पवार यांनी झालेल्या घटनेवर व्यक्त केला, तर इतके बेदम मारहाण केल्यावर कठोर शिक्षा झाल्याशिवाय त्याची किंमत लोकांना समजत नाही असेही पवार सांगायला विसरले नाहीत. तर बारामतीत सुरु असलेल्या बेकारादेशीर कृत्यांवर जबर बसविण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला पवारांनी यावेळी दिल्या.