October 24, 2025

बारामती पुन्हा मारामारीचा थरार….एकाचा खुन

WhatsApp Image 2025-04-06 at 5.52.53 PM

बारामती : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावाचे हद्दीत शनिवार दि. 5 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोघांनी धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे या घटनेत रोहित सुरेश गाडेकर ( वय 27 वर्ष ) या युवकाचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयित आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील कुलकर्णी चारी ते शेंडकर वस्ती या रस्त्या नजीक ही घटना घडली असून पैशांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनास्थळी माहिती मिळतात पोलिसांनी धाव घेतली असून जलद तपासाची सूत्रे हालवीत दोघा संशयितांचा पोलिस कसुन तपास घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

You may have missed

error: Content is protected !!