मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अल्पावधीतच केले अटक

बारामती : बारामती शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नजीक असलेल्या टी पॉईंटच्या काउंटरवर बसलेल्या युवकाला अचानक अनोळखी युवकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात वायरल झाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. मात्र अल्पावधीतच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल करीत चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असुन चौघांनाही अटक केली आहे, या प्रकरणी दीपक रतिलाल भिसे रा सावळ यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान मारहाण करणारे ते युवक इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील असून त्यांची नावे अनुक्रमे आदर्श हर्षवर्धन लोंढे, आदित्य विकास लोंढे, अनिकेत सचिन शिंदे ( तिघे रा लासुर्णे ) आणि मयूर अंकुश गायकवाड (रा अंथुर्णे ता. इंदापूर) अशी आहेत. दि 3 एप्रिल रोजी फिर्यादीचा भाऊ हेमंत रतिलाल भिसे हा टी पॉईंट कामावर असताना वर नमूद चारही आरोपींनी पाच वर्षांपुर्वीचा भांडणाचा राग मनात धरून हाताने, लाथाबुक्क्यांनी,बेल्टने तसेच लोखंडी कुलुपाने बेदम मारहाण केली.
या घटनेचा व्हीडीओ समाज माध्यमात वायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली मात्र पोलिसांनी अल्पावधीतच गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली.