बारामतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बारामती : बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील एका अल्पवयीन मुलीवर सलग आडीज वर्षे धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मला भेटली नाहीस तर तुझे फोटो व्हायरल करेन अशी धमकी देत पिडीते सोबत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती केल्याचा प्रकार धाडला आहे या प्रकरणी विश्वराज प्रताप गायकवाड ( रा करंजे ता. बारामती ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीतेने फिर्यादीत नमूद केल्या नुसार ती दहावीत असताना तिच्यासोबत जबरदस्तीने मैत्री केली तसेच तु मला फार आवडते माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे म्हणत जबरदस्तीने स्कूटीवर बसवीत कॉफी पिण्याच्या बहाण्याने नीरा – लोणंद रस्त्यावरील एका लॉजवर नेत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले शिवाय या प्रकरणी कोठेही न सांगण्या बाबत धमकी दिली हाच प्रकार वारंवार तीन वर्षे चालला आरोपीने स्वतःजवळ दोघे एकत्र असलेले फोटो काढून ठेवली त्या फोटोच्या आडोश्याने पिडीतेला वारंवार त्रास दिला जर तु मला भेटली नाहीस तर तुझे फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली आणि अखेरीस पिडीतेच्या आईच्या मोबाईलवर आरोपीने फोटो शेअर केले त्यानंतर झाला प्रकार पिडीतेच्या घरी समजल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.