उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विलास करे यांचा सन्मान
बारामती : बारामती तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून विलास नारायण करे 35 वर्ष प्रदीर्घ सेवे मधून सेवानिवृत्त झाले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. तर बारामतीच्या प्रशासकीय कार्यालयात प्रांत अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सेवापूर्ती कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी सर्व तलाठी कर्मचारी या सेवापूर्ती कार्यक्रमास उपस्थित होते..
बारामती शहरातील विलास करे हे सन 2009 रोजी लिपिक पदावर इंदापूर तालुक्यात सेवेत रुजू झाले होते. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उत्कृष्ट कामकाज करून प्रथम क्रमांक मिळवला होता.
बारामती तालुक्यात काम करताना महसूल नायब तहसीलदार पुणे विभागात सातबारा संगणीकरणाचे काम त्यांनी केले. विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते उत्कृष्ट नायब तहसीलदार पुरस्कार देखील विलास करे यांना प्राप्त झाला आहे.
दौंड येथे निवासी नायब तहसीलदार पदावर रुजू असताना तालुक्याचा कार्यभार सांभाळून इंदापूर तालुक्यातील शेती महामंडळाचे जमिनी खंडकरी शेतकरी देणे बाबत जिल्हाधिकारी विलास देशमुख, विजयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या जमिनी दिलेल्या मुदतीत त्यांनी पार पाडल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विलास करे यांचा जाहीर सत्कार देखील करण्यात आला होता.
नायब तहसीलदार म्हणून त्यांनी दौंड, बारामती, माढा ,दहिवडी तालुक्याच्या प्रभारी तहसीलदार पदावर सुद्धा त्यांनी काम केले. पारधी समाज, जोशी समाज, अंध, अपंग लोक, तृतीयपंथी यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र, तसेच शासन योजनेचे काम देण्याचे विशेष कार्य त्यांच्या हातून झाले आहे. बारामतीच्या प्रशासकीय कार्यालयात प्रांताधिकारी वैभव नावडकर तहसीलदार गणेश शिंदे, भूमी अभिलेख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार विलास करे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला.
