उच्चश्रेणी नंबर प्लेट संबंधी ग्राहकांच्या तक्रारी तातडीने सोडाव्यात – सुरेंद्र निकम

बारामती : उच्चश्रेणी नंबर प्लेट संबंधी ग्राहकांच्या तक्रारी तातडीने सोडाव्यात तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी उपस्थित अधिकारी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांना दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक देश एक नंबर प्लेट सर्व वाहनांना बसविण्यात याव्यात अशी सुचना राज्यांना करण्यात आल्या, त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सर्वत्र अंमलबजावणी करत यासंबंधी खाजगी कंपन्यांना याची निविदा देण्यात आली, त्यानुसार पुणे जिल्ह्यात ‘एफटिएएचएसआरपी
सोल्यूशन प्रा. लि. ही खाजगी कंपनी या बाबतचे काम करत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, यांच्याकडे उपप्रादेशिक परिवहन, बारामती विभागातील एचएसआरपी केंद्रा विरोधात अनेक वाहनधारकांच्या – ग्राहकांच्या तक्रारी आल्या. त्या तक्रारींची दखल घेत दि. ०२ रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली बारामती कार्यालयात संबंधित कंपनीचे अधिकारी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातील पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेत अधिकार्यांना आठ दिवसांत वाहनधारकांच्या अडचणी सोडाव्यात व पुढे गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हाअध्यक्ष ॲड. तुषार झेंडे पाटील यांनी ज्या वाहनधारकांना नंबर प्लेट सुरक्षा कवचसाठी सक्ती किंवा जास्तीचे पैश्यांची मागणी किंवा इतर कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी संपर्क साधावा असे आवाहन केले. तसेच बारामती बस स्थानक परिसरातील खाजगी प्रवासी वाहनांनवरती कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.
या बैठकीस पुणे जिल्ह्यासह संघटक दिलावर तांबोळी, बारामती तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, महिलाअध्यक्ष मंजूश्री तावरे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, संघटक सतिश खंडाळे, सचिव महेश पवार, सहसचिव युवराज इंदलकर, इंदापूर अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर,सर्व कार्यकर्त.दौंड अध्यक्ष प्रमोद शितोळे, सदस्य बाळासाहेब ननावरे, चेतन मोहीते, बाबासाहेब शिंदे, सचिन चौधर, नागेश देशमाने, शंतनु जगताप आदी उपस्थित होते