करण शेंडगेच्या प्रामाणिकपणाने जिंकली मने

बारामती : बारामतीतील वीर सावरकर जलतरण तलावात पडलेली सोन्याची चैन शोधून ती मूळ मालकाला परत करणारा प्रामाणिकपणा बारामतीच्या करण शेंडगे उर्फ मुन्ना यांनी दाखवत त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक तलावाचे जेष्ठ सल्लागार आणि माजी नगराध्यक्ष जवाहर शहा (वाघोलीकर) यांनी पाठीवरती हात ठेवून केलं तर कारणच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्याचा सत्कार देखील केला.
कोकणातून बारामतीत क्रिकेट सामन्यांसाठी आलेले कांबळे हे वीर सावरकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते तलावात पोहोताना त्यांची दोन तोळ्याची सोन्याची चैन जलतरण तलावात पडली, दुसऱ्या दिवशी हि बाब कांबळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तलावावर येऊन घटनेची माहिती दिली. तलावाचे जीव रक्षक करण शेंडगे यांनी तलाव शांत झाल्यावर पाण्यात स्वतः उतरून तब्बल तीन तास चैनचा शोध तलावात घेतल्यानंतर त्यांना चेन सापडली शेंडगे यांनी प्रामाणिकपणा दाखवत दोन तोळ्यांची सोन्याची चैन कांबळे यांना बोलवून परत केली.
तलावाचे आजी माजी संचालक मंडळ तसेच बारामतीत सर्वत्र कौतुक केले जात आहे तर तलावाचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, व्यवस्थापक सुनील खाडे, उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर, सचिव विश्वास शेळके यांनी करणचा सत्कार करून त्याचे कौतुक केले.