पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खुन

पुणे : अनैतिक संबंधात पतीचा अडथळा होत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पत्नीने प्रियकराशी संधान साधुन पतीच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे.
रवींद्र काशीनाथ काळभोर (वय 45, रा. रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काळभोर यांची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांना अटक केली आहे.
लोणी काळभोरमधील रायवाडी रोड येथील वडाळे वस्तीमध्ये एक जण जखमी अवस्थेत पडल्याचा फोन 1 एप्रिल रोजी सकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले, तेव्हा रवींद्र काळभोर यांच्या डोक्यात वार करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आल्याचे पोलिसांना प्रथम दर्शनी निदर्शनास आले.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता. रवींद्र काळभोर यांची पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता.
अनैतिक संबंधांमध्ये रवींद्र काळभोर बाधा निर्माण करत असल्याने हत्येचा कट रचला. 31 मार्च रोजी रात्री 11 वाजता रवींद्र काळभोर घराबाहेर झोपलेले असताना त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार केले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा छडा लावला.