October 24, 2025

बारामतीत उभारली काळीगुढी

WhatsApp Image 2025-03-30 at 8.07.47 PM
बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बारामतीत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला.
तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,… सरकारचं करायचं काय, खाली मुंड वर पाय.. अशा घोषणा देत बारामतीत स्वाभिमानी संघटनेच्या वतीने काळी गुडी उभारून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध करीत प्रांत कार्यालयासमोर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला.
सरकारने सातबारा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते न करता सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, तसेच सरकारने कर्जमाफीचा शब्द दिला असताना कर्जमाफी न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर काळी गुढी उभारण्यात आली यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष अमरसिंह कदम तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!