तिला राहायचं होतं लिव्ह इन; मात्र घडलं वेगळंच कांड

बारामती : बारामती तालुक्यातील एका महिलेला राहायचे होते लिव्ह इन रिलेशनमध्ये, ती आणि तो मागच्या आठ वर्षांपासून एकत्र राहत होते, मात्र त्यांचे ते नाते तिच्या नातेवाईकांना खुपत होते आणि एके दिवशी झाले वेगळेच कांड.
बारामती तालुक्यातील सादोबाचीवाडी येथील एक 48 वर्षीय महिला तिच्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती, मात्र तिच्या नातेवाकांना तिचे ते नाते पसंत नव्हते, त्यातूनच तिला आणि तिच्या मित्राला जबरी हाणमार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीला तिच्या मित्रासोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये राहायचं होतं मात्र नात्यातील पुतण्याला आणि इतर नातेवाईकांना ते तिचं लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणं खूपच होतं याचाच राग मनात धरून पुतण्याने आणि त्याच्या इतर दोन मित्रांनी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या चुलतीला आणि तिच्या मित्राला बेदम जबरी हाणमार झाल्याची घटना घडली आहे, या घटनेत फिर्यादी महिलेला आणि तिच्या मित्राला जबरी दुखापत झाली असून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.