बारामती नगरपालिकेचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

बारामती नगरपालिकेचा नगर रचना विभागातील अधिकारी फक्त सही करण्यासाठी पैसे मागायचा. त्याची एक सही किती रुपयांना ? तर सदरचा अधिकारी इमारतीच्या एकूण क्षेत्रफळाच्या बांधकामानुसार आणि त्याच्या मनाला वाटेल तेवढे पैसे फक्त एका सही साठी घ्यायचा मात्र अखेर त्याचा घडा भरला आणि पुरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
बारामतीतील एका बांधकाम व्यवसायिकाला चक्क फक्त सहीसाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती त्या लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात सदरचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तावडीत सापडला. सध्या बारामती शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष म्हणजे लाच घेतानाचा सापळा हा बारामतीतील एका जिममध्ये लावण्यात आला होता . सदरचा अधिकारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात न बसता चक्क तीन तीन तास त्या जिम मध्येच व्यायाम करीत होता अशी देखील चर्चा आहे तर त्याच जिम मध्ये त्याचे सगळे गोरख धंदे सुरू होते अशी देखील नागरिकांमध्ये चर्चा आहे व्यायामाच्या निमित्ताने जाणारा हा अधिकारी एक लाख रुपयांची लाच घेताना यामध्ये सापडला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या अधिकाऱ्याच्या लाचखोरीची चर्चा
बारामतीत होती. बारामतीच्या बांधकाम व्यवसायिकांची लूट त्याने
चालवली होती. मात्र अनेकदा बांधकाम व्यवसायिक आपले काम भले आणि आपण भले अशा स्थितीमध्ये ही प्रकरणे जिथल्या तिथे निपटून टाकायचे.
या अधिकाऱ्यांची बारामतीमध्ये लाच मागण्याची मजल जातेस कशी किंवा सदरचा अधिकारी बारामती सारख्या ठिकाणी राहून इतक्या मोठ्या रकमेची लाच मागतोच कसा हा देखील