मॉर्निंग वॉक’ ला निघालेल्या वयोवृद्धाला बसने चिरडले

बारामती : बारामतीत शहरात सकाळी सकाळी एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेत मॉर्निंग वॉक’ ला निघालेल्या वयोवृद्धाला बारामती मधील एका खाजगी कंपनीच्या बसने चिरडले असून वायोवृद्धाचा जागीच मृत्यु झाला आहे.
या अपघातात बारामतीतील मोतीलाल उत्तमचंद दोशी ( वय 82 वर्षे ) यांचा मृत्यु झाला असून दोशी हे पहाटे बारामती मधील नगरपालिकेसमोरून भिगवणच्या दिशेने मॉर्निंग वॉक’ ला निघाले असताना मागुन आलेल्या एका खाजगी कंपनीच्या बसने बस क्र. MH01 L7309 ने त्यांना चरडले त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला या प्रकरणी बस चालक सुनील पांडुरंग शेंडगे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रत्यक्ष ज्यावेळी घटना घडली तेव्हा बस चालक याने जागेवर बस न थांबविता एवढा मोठा अपघात होवून देखील अपघातात गंभीर व्यक्तीला उपचारासाठी मदत न करता चालक बससह पळून गेला त्यामुळे घटनेची माहिती बारामती शहर परिसरात वार्यासारखी पसरली आणि नागरिकांकडून झालेल्या घटनेचा प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
नातेवाईक आणि पोलिस प्रशासनाने अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहून वाहनाचा तपास लावला आणि गुन्हा दाहल करण्यात आला आहे.
बारामती – भिगवण रोड हा महामार्ग आहे तसेच या रोडवर विकासाच्या नावाखाली केलेल्या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे या रोडवर वारंवार अपघात होत आहेत, कुशल अभियंत्यांचे सल्ले घेऊन या चौकाचे सुशोभीकरण केले आहे मग तरी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे का ? जावे लागत आहे तर पॅरीसच्या धर्तीवर केलेल्या भुलभूलैय्या चौकात तर नेहमीच जीव मुठीत धरून जावे लागत असल्याचे नारीकांनी सांगितले.
निवडणुकीच्या काळात फोटोपोज देणाऱ्या नेत्यांनी या चौकाची पाहणी केली होती त्यासाठी केंद्रीय संस्था देखील आणण्यात आली होती, पण त्याचे पुढे काय झाले ? हा देखील प्रश्नच आहे.
तीन हत्ती (भुलभूलैय्या) चौकात नेहमीच अनेक खाजगी कंपन्यांच्या गाड्या वाहतूक नियमांना न जुमानता थांबलेल्या असतात त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होतेच शिवाय त्या अनेक कंपन्यांच्या गाड्यांनी चौकाला अक्षरशः त्यांचा थांबा करून टाकला आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज देखील नागरिकांनी व्यक्त केली.