अरे बापरे… आधी प्रेम, मग संबंध आणि त्यानंतर चक्क ब्लॅकमेल, महिलेची पुरुषाला धमकी…पैसे दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन

बारामती : बारामती शहरातील एका पुरुषाने चक्क महिलेवर खंडणी मागिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून जर मागितलेली रक्कम नाही दिली तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी चक्क एका महिलेने दिल्याची घटना बारामतीत घडली आहे या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित फिर्यादी आणि महिलेचे आधी प्रेम झाले, मग दोघात संबंध आले आणि त्यानंतर चक्क ब्लॅकमेल सुरु झाले.
फिर्यादी आणि आरोपी महिलेची ओळख माळेगाव येथील एका फिटनेस क्लबमध्ये झाली होती, एकत्र क्लबमध्ये असल्याने त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले त्यामुळे ते दोघे फिरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले त्या दोघांच्यामध्ये शारीरिक संबंध आले त्यावेळी बाहेर फिरत असताना त्या महिलेने तिच्या मोबाईल मध्ये काही फोटो काढून ठेवले होते. त्यानंतर 10 जुलै 2024 पासून ती महिला भेटून सतत मोबाईल मधील ते फोटो दाखवून पैशाची मागणी करायला लागली फिर्यादीने 13 जुलै 2024 रोजी तिला पंचावन्न हजार रुपये दिले त्यानंतर तिने फिर्यादीला वारंवार पैशाची मागणी करून तू जर मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी देऊन तिने वारंवार पैशाची मागणी केली दरम्यान ती गळफास घेत असल्याचे फोटो देखील फिर्यादीच्या मोबाईल पाठवून भीती दाखवु लागली ऑगस्ट 2024 मध्ये त्या महिलेने डायमंडचे मंगळसूत्र एक लाख 75 हजार रुपये किमतीचे घेतले फिर्यादीने भीतीपोटी त्या महिलेचे फोनपेवर ऑगस्ट 2024 ते मार्च 2025 पर्यंत दोन लाख 81 हजार 600 रुपये दिले साधारण 5 लाख 6 हजार सहाशे एवढी रक्कम आणि दागिने देखील तिची मागणी पूर्ण होत नव्हती ती सतत फिर्यादीला धमक्या देऊन ब्लॅकमेल करून जास्त रकमेची मागणी करू लागली तसेच तिने मागणी केलेली रक्कम दिले नाही तर ती सतत धमकी देत होती त्यामुळे फिर्यादी सतत तणावाकडे राहू लागला होता त्याच्याकडचे पैसे संपल्याने पैसे देणे बंद केले त्यामुळे महिलेने फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्यादीच्या पत्नीला आणि फिर्यादीला अर्वाच्या शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे तर संबंधित महिलेने फिर्यादीच्या घरासमोर देखील गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे जर तिला पैसे पुरवले नाहीत तर फिर्यादीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन अशी सतत धमकी देत असल्यामुळे फिर्यादीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादीच्या पत्नीने धीर दिल्यानंतर फिर्यादी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास आला आहे संबंधित महिला ही सध्या मळद ता बारामती येथे राहणारी असून तिचे मूळ गाव आझादपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा असा आहे.
संबंधित महिलेने बारामती मधील अनेक प्रतिष्ठित लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले असल्याचे फिर्यादीला समजले आहे असेही त्यांनी या फिर्यादीत नमूद केले आहे संबंधित महिलेच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.