June 27, 2025

बारामतीत पांरपारीक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा होणार साजरा

WhatsApp Image 2025-03-12 at 8.46.42 PM

बारामती : शहरातील छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर विविध कार्यक्रम आयोजित केले असुन बारामती शहर व तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्या गुरुवार दि.१३ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग हे शिवचरित्र नृत्यमहोत्सव सायं.७ वा. नटराज नाट्यकला मंदीर बारामती येथे सादर करणार आहेत. तसेच शुक्रवार दि.१४ मार्च रोजी शिव गीतांचा कार्यक्रम ह.भ.प.अवधुतजी गांधी फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज चित्रपटातील शिवगीते सादर करणार आहेत, महाराष्ट्राचा मराठी बाणा शिवबा छत्रपती झालं ग फेम शाहीर चंद्रकांत माने यांचा पोवाडा व स्फूर्ती गीते शनिवार दि.१५ मार्च रोजी सायं. ७ वा. सादर करणार आहेत. तसेच भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व शिवचरित्रांवर आधारित भव्य पुस्तक प्रदर्शन व माफक दरात विक्री शुक्रवार दि.१४ ते दि.१६ स. ९ ते सायं. ९ वाजेपर्यंत असणार असुन,
सोमवार दि. १७ रोजी स.८:३० वा.पारंपारिक पद्धतीने शिवछत्रपतींचा भव्य पालखी सोहळा कसबा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथुन होणार असुन यावेळी स्वराज्याचे गुप्तहेर, स्वराज्याचे मावळे रणमर्द शिलेदार, ढोल पथक, वारकरी पथक, हलगी पथक, गजीनृत्य पथक, झांज पथक यांचा प्रमुख सहभाग असणार आहे. असे छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने सांगितले.

error: Content is protected !!