आपत्कालीन डायल ११२ वर खोटे फोन करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती : सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस कायमच धावून येतात. अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडुन मदतीसाठीचा डायल 112 योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अडचणीच्या काळात ११२ नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ पोलिसाची मदत मिळते. मात्र विनाकारण फोन करून यंत्रणेची धावपळ उडवीत असतात अशाच एकाला विनाकारण फोन करणाराची सुपे पोलिसांनी चंगलीच जिरवली विनाकारण वारंवार फोन केल्यावरून सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील कारखेल येथील भीमा दशरथ भापकर हे विनाकारण डायल ११२ आणि १०८ यावर खोटे फोन करून यंत्रणेची धावपळ करत होता, त्याने नुकताच स्वतःच स्वतःच्या बायकोला जीवे मारतो अशी धमकी देत आहे व शिवीगाळ करत आहे असा फोन डायल ११२ वर केला आणि सुपा पोलिसांनी तत्काळ धावाधाव करीत सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सागर वाघमोडे, कारखेल गावचे पोलीस पाटील सचिन जगताप व होमगार्ड सुरज चांदगुडे असे फोन आलेल्या ठिकाणी पोहोचले मात्र एवढी धावाधाव करीत प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचल्या नंतर फोन करणाऱ्या भापकर यांनी खोटा फोन केल्याचे निदर्शनास आले फोन करणाऱ्या भापकर यांच्या पत्नीकडे चौकशी केली असता भापकर हे विनाकारण वारंवार डायल११२ नंबर वर तसेच १०८ नंबर वर खोटे फोन करत असतात , मला त्याच्यापासून कोणतेही मारहाण झालेली नाही व जिवे मारण्याचा प्रयत्नही झालेला नाही नेहमी वारंवार खोटे नाटे फोन करत आहेत. तर फोन करणारे भीमा दशरथ भापकर याला सदर फोन बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की काहीही झालेले नसताना मी असाच खोटा फोन केल्याचे सांगितले. सदरचा व्यक्ती वारंवार जाणीवपूर्वक खोटी माहिती देवुन सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्याचावर गुन्हा दाखल केला.
खोटा फोन केल्यास शिक्षा किंवा दंडही होऊ शकतो :
सुपा पोलीस स्टेशनचेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अडचणीच्या काळात ११२ नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ पोलिसानांची मदत मिळावी यासाठी सदरची सेवा अत्यंत महत्वाची आहे. सदर सेवेचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा परंतु काही इसम जाणीवपूर्वक डायल ११२ नंबर वर खोटे कॉल करतात. त्यांची माहिती संकलित केली जात आहे. खोटे कॉल केल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते; मात्र हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो. त्यामुळे डायल ११२ वर खोटे कॉल करून चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला जावून त्याला पुढील प्रक्रियेत शिक्षा किंवा दंडही होऊ शकतो. तेव्हा आपत्कालीन परिस्थिती शिवाय विनाकारण खोटे फोन करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे