June 29, 2025

नगरपरिषदांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी….जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Picsart_25-03-08_19-36-30-787
पुणे : जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींनी केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्याचा लाभ सर्व सामान्यांना पर्यंत पोहोचवा अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना या आणि आदी योजनांचा लाभ आपल्या भागातील पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथांन महाअभियान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, नमामी चंद्रभागा अभियान, या योजनांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन यांची नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी.
नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रीया याचे सुयोग्य नियोजन करावे. घनकचरा व सांडपाणी यासाठी जागा उपलब्ध करुन द्याव्यात तसेच आपल्या भागातील सर्व नागरिकांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करावे. सुरळीत पाणी पुरवठ्यासंदर्भात वॉटरमीटर बसविण्याची कार्यवाही करावी. १०० टक्के मीटरींग करुन घ्यावे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल व पाणी बचत होईल. तसेच नगरपरिषद क्षेत्रात अर्बन हेल्थ सेंटर उभारण्यात यावेत यासाठी सध्या तात्पुरत्या स्वरुपात जागा उपलब्ध करुन घ्यावी. अर्बन हेल्थ सेंटरमध्ये चांगली सुविधा देण्याच्यादृष्टीने दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे आपला दवाखाना या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
नगरपरिषद क्षेत्रात आदर्श शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शहरातील मालमत्ता कर वसुलीसंदर्भात ड्रोनद्वारे सर्वेक्षन करुन १०० टक्के मालमत्ता कराची आकारणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत शासनाच्या १०० दिवसाच्या नियोजन आराखड्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!