June 30, 2025

तीन सराईत गुन्हेगार एक वर्षांसाठी तडीपार

WhatsApp Image 2025-03-07 at 8.00.56 PM

बारामती : सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळीत तिघांची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तडीपारीचे आदेश दिले आहेत तर गुन्हेगारांवरती जरब बसविण्यासाठी दोन महिण्यात सहा जणांना तडीपार केले आहे.

यातील हद्दपार इसम यांचेवर बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे तसेच बारामती शहर पोलीस ठाणेत नागरीकांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन नागरीकांना मारहाण करणे तसेच घातक शस्त्रांचा वापर करून गावतील व्यापारी, हॉटेल व्यावसायीक, टपरीधारक व इतर छोटेमोठे व्यवसाय करणारे नागरिकांना दमदाटी करून त्यांचेकडुन पैसे उकाळणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे मेडद ता. बारामती जि.पुणे या गावातील टोळी प्रमुख महेश उर्फ एक्का दत्तात्रय काशीद,(  वय-३२ वर्षे ) १) सुरज उर्फ माउली सोमनाथ काशीद ( वय २२ वर्षे रा. मेडद ता. बारामती) तसेच इंद्रजित माणिक सोनवणे ( वय-२५ वर्षे रा. क-हावगज ता. बारामती ) यांना एक वर्षे कालावधीकरीता संपुर्ण पुणे जिल्हा पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयसह सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यामधून हद्दपार करण्यात आले आहे.

यांच्या वाढलेल्या दहशतीमुळे सर्वसामान्य लोक, मजुर, नोकरदार वर्ग गावतील व्यापारी, हॉटेल व्यावसायीक, टपरीधारक व इतर छोटेमोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक या सर्वांना यांच्या गुन्हेगारी कृत्यापासुन भयमुक्त करण्यासाठी व त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा बसावा व त्यांचेवर कायदयाचा धाक राहणे आवश्यक असलेने त्यांना तडीपार करावे या करीता माळेगाव पोलीस ठाणे कडून वरील नमुद इसमांविरुद्ध प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर तडीपार प्रस्तावाची पोलीस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करुन वर नमुद इसमांना एक वर्षे कालावधीकरीता हद्दपारचे आदेश केले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख , अपर पोलीस पोलीस अधीक्षक  गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,  वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अविनाश शिळीमकर, यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, तसेच प्रतिबंधक कारवाई विभागाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर, पोलिस कर्मचारी जालिंदर बंडगर, यांनी केलेली आहे. सदर कामी त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहय्यक फौजदार महेश बनकर, कर्मचारी रामदास बाबर यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!