रविवारी बारामतीत जन आक्रोश मोर्चा
बारामती : स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा बारामती यांच्यावतीने रविवार दिनांक 9 मार्च रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे छायाचित्र समाज माध्यमात वायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद बारामतीत उमटले मराठा समाजाने या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील जिजाऊ भवन येथे तातडीची बैठक घेऊन जनअक्रोश मोर्चाचे आयोजन केले रविवारी दि. 9 मार्च रोजी सकाळी 8 वाजता शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथून मोर्चाला सुरुवात होणार असून मोर्चा शहरातून भिगवन चौक येथे दाखल होणार आहे तरी सर्व समाजाच्या बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
