अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिशचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

बारामती : येथील अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेस यांचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षभरातील वेगवेगळ्या उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक सुरज सातव, शेतकरी योद्धाचे संपादक योगेश नालंदे, बारामती नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सोनाली राठोड, योद्धा प्रोडक्शनचे नानासाहेब साळवे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत क्लासच्या अथक परिश्रमाला शुभेच्छा दिल्या. एका छोट्याशा स्वप्नातून सुरू झालेला हा प्रवास तेरा वर्षांपर्यंत पोहोचला असून आजतागायद हजारो विद्यार्थी पानसरे दाम्पत्यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण घेत आहेत याचा बारामतीकरांना अभिमान वाटतो असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या महिला व बालकल्याण विभागामार्फत बारामती नगरपालिका हद्दीतील महिलांसाठी मोफत स्पोकन इंग्लिश क्लासेस घेतले जातात हे क्लासेस अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश यांचेच होत असतात यावेळी कोर्स पूर्ण केलेल्या महिलांनाही प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना पानसरे यांनी तर आभार प्रकाश पानसरे यांनी मानले. सर्व विद्यार्थी पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.