बारामतीत पुन्हा विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक कार्याचा सपाटा

बारामती : बारामतीत पुन्हा विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळ ॲक्टिव्ह मोडवर आले असून पुन्हा बारामतीत सामाजिक कार्याचा सपाटा या मित्र परिवाराने सूर केला आहे. त्याचे कारणही तसेच आहे या मित्र परिवाराचा एकच खटपट ते म्हणजे सामाजिक कार्य झटपट, आपल्या या आगमनाने, हर्ष मनी तो दाटला…, प्रांगणी हा गोतावळा , बघा सत्कारास तो जमला….या प्रमाणे जिथे विष्णुपंत तिथे सत्काराचा गोतावळा या प्रमाणे पंतांनी बारामतीत मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य जोपासले आहे. काही सामाजिक कार्यकर्ते कारण पाहून सामाजिक कार्य करीत आहेत, मात्र विष्णुपंत चव्हाण मित्र परिवार सकारनाने सत्कार्य या प्रमाणे सामाजिक कार्य करताना वारंवार निदर्शनास येत आहे ज्यांना सामाजिक कार्यासाठी कारणाची आणि मुहूर्ताची गरज लागत नाही.
स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने ॲड सुधीर पाटसकर यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच सायकल वाटपाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला, यावेळी बी.ए.के.ए.पी. इंग्रजी माध्यम शाळा बारामती येथील विध्यार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आल्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली निंबाळकर यांच्या शुभहस्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत चव्हाण शाळेच्या शिक्षिका श्रद्धा कवितके, मनीषा आगवणे, मेघा वाळके, अहिल्या येळे, सोनाली राठोड, प्रकाश नेवसे ,रासकर पाटील, स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराचे अध्यक्ष, चिऊशेठ जंजिरे, कार्याध्यक्ष, नरेंद्र मिसाळ, विठ्ठल आगवणे, पवनराजे बनसोडे, नेताजी बुरुंगले पाटील, अजय कदम, व इतर मान्यवर यांच्या उपस्थित विध्यार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आल्या.