दोघांची येरवड्याला रवानगी

बारामती : चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून विशाल शामराव पवार ( वय 36, रा. लासुर्णे , तालुका इंदापूर ) व प्रज्वल प्रताप मोडपणे पाटील ( वय 22 रा. पिटकेश्वर तालुका इंदापूर ) अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत, दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी इंदापूर व वालचंद नगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
दोघेही शनिवारी दि. 1 मार्च रोजी शेटफळगडे ता.इंदापुर येथे भिगवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याने चौकशीत पोलिसांच्या निदर्शनास आले या दोघांच्या विरोधात अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्याकडे प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव दाखल झाला होता विशेष कार्यकारी अधिकार पदाचा वापर करत बिरादार यांनी या दोघांची येरवडा कारागृहात रवानगी केली.