October 24, 2025

पोलिस असल्याची बतावणी करीत दिड लाखांचा घातला गंडा

fir-1

बारामती : बारामतीत तालुक्यात आणखी एक नवा गुन्ह्याचा प्रकार समोर आला आहे यामध्ये चक्क पोलिस असल्याची बतावणी करीत एका वयोवृद्ध शेतकऱ्याला दिड लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.

सविस्तर हाकीकात अशी की 3 मार्च रोजी फिर्यादी वयोवृद्ध शेतकरी हे दुपारी सांगावी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतुन 4500/- रुपये काढुन मोटार सायकलवरुन सांगवी ते शिरिष्णे रोडने घरी जात असताना महादेव पुलाजवळ थांबलेल्या एका अज्ञात व्यक्तीने थांबवले व म्हणाला की “मी पोलीस असुन जवळील शिंदेवस्ती येथे चोरी झाली असुन मी तेथे तपासासाठी चाललो आहे त्याच दरम्यान आणखी एक अनोळखी इसम आला तेव्हा सदर अज्ञात मोटारसायकल स्वाराने सांगितले की “या परीसरात खुप चोऱ्या होत आहेत तरी तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने व पैसे आप आपल्या रुमालात बांधुन ठेवा” असे म्हणाला, आणि  चालत आलेल्या दुसऱ्या इसमाने त्याचे दागिने व पैसे त्याचे रुमालात माझे समोर बांधले तेव्हा मोटार सायकल चालकाने फिर्यादीला अंगावरील दागिने व पैसे रुमालात बांधणेस सांगितले. त्याप्रमाणे गळ्यातील सोन्याची चैन व हातातील सोन्याची अंगठी तसेच 4 हजार 500 रुपये असलेले पैशाचे पाकीट असे रुमालात ठेवले त्यानंतर त्या इसमाने रुमाल गुंडाळुन त्यास गाठ मारुन तो गाठ मारलेला रुमाल फिर्यादीच्या ताब्यात दिला. मात्र फिर्यादीने घरी जावुन रुमाल उघडुन पाहीला असता त्यामध्ये मोकळ्या पाकीटा व्यतीरिक्त काहीच नव्हते तेव्हा झाला प्रकार फिर्यादीच्या लक्षात की सदर इसमांनी ते पोलीस असल्याची बतावणी करुन तसेच हातचलाखीने दिशाभुल करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 1,54,500/- रुपयांचा ऐवज लुबाडुन ठकवणुक केली आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात दोन अज्ञात इसामांवीरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You may have missed

error: Content is protected !!