शिवजयंतीनिमित्त विद्या प्रतिष्ठान येथे रक्तदान शिबीर संपन्न

बारामती : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे संयुक्त रक्तदान शिबीर संपन्न झाले.
येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माणिकबाई चंदुलाल सराफ रक्त पेढी व विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वसंतराव पवार विधी महाविद्यालय, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात 45 महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, डॉ. संजय सूर्यवंशी व इतर शिक्षक प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून स्वेच्छेने रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यासाठी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगल ससाणे, प्रा. अमित दिव्हारे, डॉ. जगदीश सांगवीकर, माजी कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय सूर्यवंशी, विधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बनसोडे व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शेरखाने व रक्त पेढीचे जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांनी हे रक्तदान शिबिर आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.