बारामतीत घडला माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार ; अवघ्या आठ वर्षाच्या मुलाच्या अवघड जागेवर लाल तिखट लावून मारहाण
बारामती : बारामतीत घडणाऱ्या गुन्ह्यांची दिवसेंदिवस तीव्रता वाढत चालली असुन, गुन्हा करणारांच्या गुन्हा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना समोर येत आहेत असाच एक माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार बारामती शहरात घडला आहे अवघ्या आठ वर्षाच्या अल्पवीन मुलाच्या अवघड जागी लाल तिखट लावून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
बारामती तालुक्यातील मौजे डोर्लेवाडी येथील अवघ्या आठ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला एका प्रौढ पुरुषाने अमानुष पणे अवघड जागी लाल तिखट लावून तसेच एक चमचा लाल तिखट खायला लावून मोबाईल चार्जरच्या वायरने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात शिवाजी सुर्यकांत शेळके रा डोर्लेवाडी ता बारामती यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक आधीनियामाने तसेच मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
