इंडियन मेडिकल असोसिएशनची राज्यस्तरीय परिषद संपन्न

बारामती : इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि इंडियन मेडिकल असोसिएशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे वैद्यकीय न्यायशास्त्र या विषयावर राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत वैद्यकीय क्षेत्राला लागू होणारे विविध कायदे त्यातील बारकावे त्यांचे पालन तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन या विषयांवर उपस्थित तज्ञांनी मार्गदर्शन केले या परिषदेत साधारण 500 डॉक्टरांनी सहभाग घेतला. इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम, सचिव डॉ. अनिल आव्हाड, आयएमए मुख्यालय उपाध्यक्ष डॉ. होजी कपाडिया, माजी अध्यक्ष महाराष्ट्र वैद्यक परिषद डॉ.शिवकुमार उतुरे, माजी सचिव आयएमए मुख्यालय डॉ जयेश लेले, मेडिको लीगल सेलचे अध्यक्ष डॉ. बिपिन चेकर या मान्यवरांची उपस्थिती या परिषदेला लाभली. यावेळी मान्यवर आणि मेडिकल लीगल सेलच्या सदस्यांनी देखील मार्गदर्शन केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयएमए बारामतीच्या अध्यक्षा डॉ. साधना कोल्हाटकर, सचिव डॉ. निकिता मेहता, आणि खजिनदार डॉ. प्रियंका आटोळे यांनी आणि त्यांचे सहकारी डॉ. दीपिका कोकणे डॉ. सौरभ मुथा, डॉ. एम.आर.दोशी, डॉ.अविनाश आटोळे, डॉ.अमोल भंडारे, डॉ. दादा वायसे, तसेच डॉ. शरयू दुर्गुडे, डॉ.नीती महाडिक, डॉ. वर्षा सिधये यांचे परिषदेला सहकार्य लाभले.