स्वाभिमानी सभासदांच्या पाठीशी पूर्ण ताकत लावू

बारामती : जर का स्वाभिमानी सभासद शेतकरी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्याचा निर्णय घेतला तर त्या स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकत लावून खंबीर पणे उभे राहण्याचे मत युवानेते युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले त्यामळे आगामी काळात येऊ घातलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याचे संकेत युगेंद्र पवार यांनी दिले.
पवार पुढे म्हणाले की माळेगाव सहकारी साखर कारखाना हा जेष्ठ नेते खा. शरद पवार यांचा कारखाना म्हणून ओळखला जातो पवार साहेब हे स्वतः त्या कारखान्याचे सभासद आहेत, त्या कारखान्यासाठी जेवढे काम पवार साहेबांनी केले आहे तेवढे काम आज पर्यंत कोणी केले नाही त्या कारखान्याचा विकार हा जेष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळेच झाला आहे मग कारखाना असो वा तिथले अभियांत्रिकी महाविद्यालय असो हे पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले आहे. मात्र आजच्या घडीला सभासद शेतकरीवर्गामध्ये काराखाण्याबाद्द्ल प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे कारखान्याचा स्वाभिमानी सभासद शेतकरीवर्ग आगामी कारखान्याच्या निवडनुकीत निवडणूक लढवू इच्छित असतील तर आमची पूर्ण ताकत आम्ही लावू त्याच सोबत पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असा विश्वास युगेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केला. तसेच यापुढे राष्ट्रवादी शरद पवार गट हा यापुढच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सोसायट्या आणि कारखान्याच्या निवडणुका लढविणार असल्याचे देखील स्पष्ट केले.
तर त्या अनाथ आश्रमात काही तरी गडबड असू शकते
बारामतीच्या चर्च ऑफ ख्राईस्ट बॉईज होममधून सन 2016 पासून जवळपास 24 मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी 16 मुले सापडली, तर तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अद्यापही 5 मुलांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या संदर्भाने विचारले असता पवार म्हणाले की, बारामती सारख्या शहरातील एका अनाथ आश्रामातुन चोवीस अनाथ मुले गायब होत असतील आणि त्या घटनेची दखल पोलिस प्रशासन घेत नसेल तर ही भयानक घटना आहे. संबंधित अनाथ आश्रमाची मुले गायब होत आहेत त्याची पोलिस प्रशासनाने दखल घेऊन चौकशी केली पाहिजे तर त्या अनाथ आश्रमातुन चोवीस मुले गायब होत असतील तर तिथे काही तरी गडबड असू शकते अशी शंका बोलताना युगेंद्र पवार यांनी व्यक्त केली.