June 27, 2025

पोलिसांचा मद्य विक्रेत्याला दणका,  दोन आठवड्यांसाठी वाईन शॉप सील.

WhatsApp Image 2025-02-25 at 7.02.47 PM

बारामती : बारामती शहर पोलिसांनी एका मद्य विक्रेत्याला दणका दिला असून दोन आठवड्यांसाठी त्या मद्य विक्रेत्याचे वाईन  शॉप पोलिसांनी सील केले आहे.

नितीन वाईन शॉप साठेनगर बारामती समोर जीवघेणे हल्ले,  तसेच मारामारी , व दंगा झाल्याचे व्हिडिओ प्रसारमाध्यमावर व्हायरल झालेले होते. सदर मारामारीमध्ये नितीन वाईन शॉप मधील व्यवस्थापक तसेच कामगार यांचा समावेश दिसून येत होता. या व्हिडिओतील मारामारी करणारे इसम अक्षा काकडे उर्फ बागवान हा  रेकॉर्डवरील गुंड असून तो यापूर्वी पोलीस ठाणे अभिलेखावरून तडीपार झालेले आरोपी आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या व्हिडिओच्या अनुषंगाने नितीन वाईन शॉप चालवणारे मॅनेजर तसेच मालक मारामारी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीचे इसमा विरुद्ध रीतसर फिर्याद देण्याबाबत पोलीस स्टेशन मध्ये चर्चा केली असता फिर्याद दिली नाही. फिर्याद देण्यास नकार दिल्यावरून संबंधित गुंड लोकांच्या विरुद्ध त्यांचे मनात भीती असल्याने समाज माध्यमातून लोकांच्या मनात दहशत निर्माण झालेली असल्या कारणाने संबंधित गुंड इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई होत नसल्याने, चुकीचा संदेश जात होता. त्या अन्वये सदर वाईन शॉप समोर बेकायदेशीर जमाव जमून दंगा होण्याची निश्चितपणे खात्री झालेली होती. तसेच त्या प्रकारची गोपनीय माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यामुळे दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार नितीन वाईन शॉप दोन आठवड्या करिता बंद ठेवण्याचे आदेश पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आले आहेत.

बारामती मध्ये प्रथमच अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली असून या अन्वये बारामती शहरांमधील सर्व आस्थापना यांचे चालक-मालक यांना आश्वासित करण्यात येते की कोणत्याही गुन्हेगाराविरुद्ध भीती अथवा भय न बाळगता त्यांनी समोर येऊन त्याचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद नोंदवावी अशा गुन्हेगारांविरुद्ध बारामती पोलीस स्टेशन कडून सक्त कारवाई करण्यात येईल. सदरची कारवाई  अप्पर पोलीस अधीक्षक  गणेश बिरादार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी  सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास नाळे बारामती शहर यांनी केली आहे.

error: Content is protected !!