थकित मिळकत धारकांवर बारामती नगरपरिषदेची धडक मोहीम

बारामती : बारामती शहरातील सन 2024 -2025 या वित्तीय वर्षामध्ये बारामती नगरपरिषद हद्दीतील थकित मालमत्ता धारक यांना अधिपत्र बजावून वांरवार घरभेटी देवूनही मालमत्ता धारक यांनी नगरपरिषदमध्ये वसुलीचा भरणा केलेला नाही. वसुली पथके व जप्ती पथकाव्दारे थकित मालमत्ता धारकावर घडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
थकीत मालमत्ता धारकांवर कवाई करून मालमत्ता सील, जप्ती करणे , जप्त केलेला माल अटकाव करणे इत्यादी नियमोचित करणेचे काम युध्द पातळीवर नगर पालिकेने सुरु केले आहे. सन 2024 – 2025 या वित्तीय वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी बिले भरलेली नसतील तर बारामतीकरांनी तात्काळ ऑनलाईन माध्यमाद्वारे मिळकत कर भरू शकतात तसेच बारामती शहरातील वाढीव व मुळ हद्दीतील मिळकत धारकांनी तात्काळ आपली घरपट्टी व पाणी पट्टी भरून सहकार्य करण्याचे आवाहान करण्यात आले आहे.