गोवंश हत्या कायद्यानुसार पोलिसांची कारवाई

बारामती शहरातील देवळे इस्टेट येथील माढा कॉलनी येथे काही इसम गोवंश जातीचे मांस व जिवंत जनावरे बेकायदा मांस आणि जनावरे ठेवली असल्याची पोलीस मिळाली त्यानुसार संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये 1200 किलो गोवंश जातीचे मांस तसेच दोन जर्सी गाई व दोन जर्सी वासरे तसेच तीन चार चाकी वाहने असा एकूण 6,42,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून इसम नामे 1) सलिम चाँद कुरेशी ( रा फलटण रोड महालक्ष्मी शोरुम समोर बारामती ) 2) सुफीयान रफीक बागवान ( रा रविवार पेठ शतरंजवाला चौक पुणे ) 3) गुलाब बनीलाल शेख ( रा जगतापमळा बारामती ) 4) सफैन अमिन शेख ( रा आसु ता फलटण ) तसेच 5) गौस मुबारक कुरेशी 6) मैनु मुबारक कुरेशी ( दोघे रा फलटण रोड बारामती) 7) असिफ मुस्तफा कुरेशी ( रा म्हाडा कॉलनी बारामती) अशा एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशन करीत असून यामध्ये आणखीन काही इसम यांची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी केली.