अफुच्या शेतीवर कारवाई ; २७ लाख रुपयांची अफु हस्तगत

बारामती : इंदापूर तालुक्यातील न्हावी गावाचे शिवारात शेती मालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी बेकायदेशीर विनापरवाना लागवड करण्यात आलेल्या अफुच्या शेतीवर कारवाई करत एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करून तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखा व वालचंदनगर पोलिस स्टेशन यांनी कारवाई केली.
अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेवून विक्री केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातूनच कायद्याचा भंग करून काही लोक शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार स्वप्निल अहीवळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे न्हावी ता. इंदापूर जि. पुणे गावचे हद्दीत रतन कुंडलिक मारकड व बाळु बाबुराव जाधव यांनी त्यांचे मालकीचे शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफूच्या झाडांची लागवड विक्री करणेच्या उद्देशाने करून उत्पादन घेतले आहे, सदर बातमीचा आशय पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना सांगितला त्यांचेकडून कारवाईचे आदेश प्राप्त करून स्थानिक गुन्हे शाखा, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने न्हावी गावात जावून मिळालेल्या बातमीचे आधारे नमुद संशईत इसमांचे शेतात जावून पाहणी करून कारवाई केली असता, शेतामध्ये उपस्थित इसम नामे १) रतन कुंडलिक मारकड ( वय ५० वर्षे ), २) बाळु बाबुराव जाधव, (वय ५४ वर्षे) , दोघे रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले, त्या दरम्यान त्याच परिसरातील इसम नामे ३) कल्याण बाबुराव जाधव ( वय ६५ वर्षे रा. न्हावी ता. इंदापूर) हे त्यांचे शेतात उपस्थित असताना त्या शेताची पाहणी केली असता त्यांचे शेतांमध्ये देखील अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. अफुची लागवड केलेली दिसून येवू नये याकरीता शेतात कांदा व लसून पिकांची लागवड करून चहु बाजूने मका या पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते. कारवाई दरम्यान एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करणेत आलेली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, वालचंदनगर वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, राहुल गावडे, पोलीस अंमलदार स्वप्निल अहीवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगडु विरकर, आसिफ शेख, रामदास बाबर, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, महेश बनकर, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विभीषण सस्तुरे, वालचंदनगर पो स्टे कडील पो.स.ई. विजय तेळकीकर, पोलीस अंमलदार रविंद्र पाटमास, बापू मोहिते, गुलाब पाटील, शरद पोफळे, विक्रमसिंअ जाधव, अभिजीत कळसकर, गणेश बनकर महिला पोलीस अंमलदार स्मिता गायकवाड, मेघा शिंदे यांनी केली.