वेळ आली होती, पण काळ आला नव्हता…

बारामती : बारामतीत एका आवलीयाचे नशीब बलवत्तर होते म्हणुन जीव वाचला, कारण वेळ आली होती मात्र काळ आला नव्हता असे म्हणावे लागेल, त्याचे कारणही तसेच आहे. शहरातील एक देखील तशीच घडली आहे.
बारामती शहरातील प्रबुद्धनगर येथे विद्युत वाहिनीचा बिघाड झाल्याने स्थानिक लाईनमन आणि ठेक्याने कामावर असणारे गणेश चव्हाण हे विद्युत वाहिनीचे काम करीत असताना वायु जोड ( गॅस वेल्डिंग ) देण्याचे काम सुरु होते अचानक गॅस टाकीचा पाईप लिक असल्याने गॅसने पेट घेतला व स्पोट झाला गणेशच्या चेहऱ्याला इजा झाल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांना आला उपस्थितांनी तात्काळ गणेश चव्हाण यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले, झालेल्या घटनेत गणेश चव्हाण यांना चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली. मात्र घटनेची दाहकता एवढी होती की क्षणात एकच धांदल उडाली. मात्र उपस्थित नागरिकांच्या तोंडी एकच वाक्य बाहेर पडत होते वेळ आली होती, मात्र काळ आला नव्हता. गणेश चव्हाण हे सुखरूप आहेत.