त्या बहुचर्चित बांधकामाला मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Real Estate Law concept. Model of house and a gavel.
बारामती : बारामतीतील बहुचर्चित पाटस रोड येथील राधाकृष्ण मंगल कार्यालायानाजिक नगरपालिकेच्या परवानगीशिवाय बांधण्यात आलेले बांधकाम पडण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अंशतः तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगिती देत मिळकत धारकाला दिलासा दिला आहे.
बारामती शहरातील पाटस रोड येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय जवळील मिळकत बेकायदेशीर बांधकाम करत असल्याबाबतची लेखी तक्रार बारामती नगरपरिषद बारामती यांच्याकडे करण्यात आली होती नगरपालिकेने ठोस निर्णय न घेतल्याने तक्रारदाराने न्यायालयात धाव घेत बेकायदा मिळकत सात दिवसात पाडण्याचे आदेश मेहरबान उच्च न्यायालयाने दिले होते त्या निर्णयाविरोधात मिळकत धारकाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने मिळकत धारकाला दिलासा देत बांधकाम पाडण्याच्या आदेशाला अंशतः तात्पुरत्या कालावधीसाठी तूर्त तरी स्थगिती दिली आहे.