रेल्वे रुळावर महिलेचा मृतदेह, आत्महत्या की घातपात चर्चेला उधान

बारामती : बारामतीत रेल्वे रुळावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून ती घटना आत्महत्या की घातपात असेल याचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे.
बारामतीत येथील सहयोग सोसायटीच्या मागच्या बाजूला रेल्वे रुळावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला रेल्वेखाली चिरडले गेले असल्याचा प्राथमिक अंदाज असून या महिलेच्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येत आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यु दाखल केले सुरुवातीला मृत महिलेची ओळख पटली नव्हती मात्र सोशल मिडीयात पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नातेवाईक यांच्याशी संपर्क झाला असून सदरची घटना घातपात आहे का ? आत्महत्या याचा तपास पोलिस प्रशासन घेत आहेत.