आंतरशालेय कराटे स्पर्धेत अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कुल सर्वोत्तम संघ

बारामती : हडपसर पुणे येथील अॅमेनोरा शाळेने पुणे येथे ‘८ वी पुणे जिल्हा आंतरशालेय कराटे स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातून १९ शाळेच्या ३७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये बारामतीतील अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कुल बारामती या शाळेतील १६ विद्यार्थ्यांनी ७ गोल्ड, व ९ ब्राँझ मिळवित सर्वोत्तम संघ म्हणून सन्मान पटकाविला.
सदर स्पर्धेचे उद्घाटन कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संदिप गाडे , अॅमेनोरा स्कुलचे विनायक कोपार्ड, मुख्य प्रशासक, व चंद्रकांत बासा को-स्फोलास्टीक कॉरडीनेटर, यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.
यशस्वी विद्यार्थीचे नांव व मेडल पुढील प्रमाणे – १) रुद्र गाडेकर- गोल्ड मेडल, २) यज्ञेश चव्हाण- गोल्ड मेडल, ३) अनुराग हसबनीस – गोल्ड मेडल, ४) हर्ष भोपळे- गोल्ड मेडल, ५) आदेश गायकवाड- गोल्ड मेडल , ६) आरिषा संचेती- गोल्ड मेडल , ७) सिया खराडे- गोल्ड मेडल, ८) यशवर्धन गायकवाड- ब्राँझ मेडल ९) सक्षम जगताप- ब्राँझ मेडल १०) आयुष पराडे- ब्राँझ मेडल ११) आरुष गांधी- ब्राँझ मेडल १२) ज्योतिरादित्य परकाळे- ब्राँझ मेडल १३) सिद्धी गाडेकर- ब्राँझ मेडल १४) भूमी नालंदे- ब्राँझ मेडल १५) राजगौरी पाटील- ब्राँझ मेडल १६) श्रीजा टेंगळे- ब्राँझ मेडल असे एकूण १६ मेडम स्कूलने पटकावले.
अनेकान्त स्कूलला सर्वोत्तम संघ म्हणून सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षिक मिननाथ भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या उत्तम प्रदर्शनाबद्दल स्कूलचे अध्यक्ष चंद्रवदन शहा (मुंबईकर), शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच स्कूलच्या प्राचार्या यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.