पुन्हा एनडीकेच्या मद्यधुंद वाहन चालकाचा नागरिकाच्या जीवाशी खेळ

बारामती : ठेकेदार एक आणि त्या ठेकेदाराच्या करामती अनेक असाच बारामती नगरपालिकेचा एनडीके नामक ठेकेदार आहे, त्याच्या बारामतीत वारंवार करामती घडत आहेत. आज बारामतीत पुन्हा एनडीके या ठेकेदाराच्या मद्यधुंद वाहन चालकाने बेजबाबदार पणे वाहन चालवुन एका नागरिका सह त्याच्या शाळकरी मुलीचा जीव धोक्यात घातल्याची घटना घडली आहे या प्रकरणी संतप्त पालकाने प्रशासकीय बेजबाबदार प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
आज सकाळी तीनहत्ती चौकातून भिगवण रोडने पालक योगेश नाळे हे आपल्या वाहनावरून मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना एनडीकेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहन चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवुन त्या वाहनाने नाळे यांना ओढत नेऊन नेले सदरचा ठेकेदाराचा वाहन चलक बेधुंद नशेत वाहन चालवत होता अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली तसेच तो नेहमी नशेतच वाहन चालवीत असतो असेही नागरिकांनी सांगितले, या घटनेत ठेकेदाराच्या वाहन चालकाचा नशेत असल्यामुळेच वाहनावरचा ताबा सुटला होता या घटनेत सुदैवाने कोणताच अनुचित प्रकार घडला नाही, मात्र पालक योगेश नाळे यांना सदरच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने रस्त्यावर काही अंतरापर्यंत फरपटत ओढत नेले आणि चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, ही झालेली घटना पाहून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांचा संतापले आणि त्यांनी संबंधित ठेकेदाराच्या वाहनाला अडविले, झालेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी पालक योगेश नाळे यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांना फोन केला असता मुख्यधिकारी घ्तानास्थाळी आले नसल्याने पालक योगेश नाळे यांनी मुख्य भिगवन रोडवरच ठिय्या केला.
घटनेमुळे उपस्थित नागरिक आणि पालक घटनास्थळी चांगलेच संतापले होते. महिनाभरापूर्वीच याच इंडिकेच्या ठेकेदाराच्या घंटागाडीने माजी उपनगराध्यक्ष सौ ज्योती नवनाथ बल्लाळ आणि त्यांच्या इतर दोन महिला सहकार्यांना गाडी रिव्हर्स घेताना धडक दिली होती त्यावेळी देखील माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी मुख्याधिकारी आणि पोलीस ठाणे येथे तक्रारी दिल्या होत्या त्यावर बल्लाळ यांना कारवाईचे आश्वासन मिळाले होते सदर एनडीके नामक नगरपालिकेच्या ठेकेदारावर नेहमीच बारामतीकर संतप्त प्रतिक्रिया देतात मात्र नगरपालिकेचे प्रशासन यावर कोणतीच ठोस भूमिका किंवा कारवाई का करत नाही असा सवाल नागरिकांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे.
बारामतीत या एनडीके ठेकेदार आणि सदरच्या जबाबदार वाहनचालक यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद देणार आहेत तसेच ठेकेदारावर ठोस कारवाईची मागणी देखील करण्यात येणार आहे. तर सदरच्या वाहन चालकाकडे बोगस वाहन चालविण्याचा परवाना असल्याची देखील चर्चा होती त्याच बरोबर ज्या वाहनाने ही घटना झाली त्या वाहनावर वाहन क्रमांक देखीन नव्हता